Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर उद्योजक विजय कंग्राळकर, राजीव साळुंखे, अभियंता संग्राम गोडसे, दीपक किल्लेकर, रेणुका सप्रे, शिवराज पाटील, जी. जी. कानडीकर उपस्थित होते. डॉ. विनोद गायकवाड व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सृष्टी आपटेकर, सोनाली पाटील, वैशाली वाडीन्नावर, तन्वी पाटील, श्रावणी कंग्राळकर, साईराज पाटील, कृष्णा मुरकुटे, श्रेयस घाडी, कृपा जाधव, अवंती कणगुटकर, काजल गावडे यांच्यासह एकूण 147 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर लगाडे यांनी तर संग्राम गोडसे यांनी आभार मानले. यावेळी राजू पावले, दत्तात्रय जाधव, मोहन सप्रे, एस. ओ. जाधव, आर. बी. बांडगी यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *