Friday , September 20 2024
Breaking News

सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात ऑक्टोबरमध्ये 1.20 कोटीचे दान

Spread the love

बेळगाव : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका-यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर प्रथमच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत भक्तांनी विक्रमी दान दिले आहे. महामारी कोरोनामुळे अन्य देवस्थानांप्रमाणेच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानही 1 वर्ष 8 महिने बंद ठेवण्यात आले होते. 28 सप्टेंबरपासून देवस्थान भक्तांसाठी खुले करण्याचा आदेश बेळगाव जिल्हा प्रशासनाने बजावला होता. तेंव्हापासून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भक्तांनी सौंदत्तीत येऊन रेणुका-यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले आहे. शुक्रवारी सौंदत्ती तालुका प्रशासनातर्फे देवस्थानच्या हुंडीत ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या दानाची मोजदाद करण्यात आली. त्यावेळी केवळ एकाच महिन्यात तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागदागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले. यात 15 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे, 2 लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने दान स्वरूपात हुंडीत जमा झाले. देवस्थानच्या 85 आणि बँकांच्या कर्मचार्‍यांनी या मोजणीत भाग घेतला. हुंडीत व अन्य मार्गाने सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानचे वार्षिक उत्पन्न 4 कोटी रुपये इतके आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *