बेळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी रायबाग येथे काँग्रेसची भव्य प्रचारसभा होणार आहे. पक्षाचे अनेक बडे नेते या सभेला संबोधित करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी रायबाग येथे उद्या प्रचारसभा होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, माणिकसिंग ठाकूर, आयवन डिसोझा आदी बडे नेते या सभेत संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चन्नराज हट्टीहोळी यांच्या भगिनी व बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज सभास्थळाला भेट देऊन सभेच्या तयारीची पाहणी केली. निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस नेते माजी आ. श्याम घाटगे, महेंद्र तम्मण्णावर, डी. एस. नायक, अप्पासाहेब कुलगुडे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष इरगौडा पाटील, सदाशिव देशींगे, महावीर मोहिते, सुकुमार पाटील, अर्जुन बंडगार, बी. एन. बंडगार, दिलीप जमादार, हाजी मुल्ला, जगदीश येळ्ळूर, गंगाधर कांबळे आदी उपस्थित होते.
