बेळगाव : सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक लांबणीवर पडली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी दोनवेळा निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणूक अधिकारी म्हणून असणारे अशोक शिरुर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
सुळगा (ये) ग्राम पंचायत अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय अ आरक्षण जाहीर झाले आहे. यासाठी एका महिलेने अर्ज दाखल केला होता. मात्र मागासवर्गीय ब सदस्याने अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान कोरम भरत असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक घेण्यास कानाडोळा केला. त्यामुळे याला काहींनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
सुळगा (ये) ग्राम पंचायतमध्ये एकूण १० सदस्य आहेत. त्यामध्ये पाच महिला व पाच पुरुष संख्या आहे. अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय अ आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे एका महिला सदस्येने अर्ज दाखल केला होता. दरम्यान मागासवर्गीय ब आरक्षणावर निवडून आलेल्या सदस्याने मागासवर्गीय अ वर्गासाठी अर्ज दाखल केल्याने गोंधळ उडाला आहे. दरम्यान, कोरम पूर्ण भरत असतानाही निवडणूक घेण्यात आली नाही. निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याकडे कानाडोळा केला. यामुळे दोनवेळा निवडणूक रद्द झाल्याची माहिती आहे. काही सदस्यांनी याला आक्षेप घेत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta