बेळगाव : खतरनाक बॅटरी चोरांना जेरबंद करण्यात बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी पोलिसांना यश आले आहे.
मोहरमच्या पार्श्वभूमीवर गस्तीवर असलेल्या हारुगेरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हारुगेरी क्रॉस येथे संशयास्पद टाटा एसई मिनी गुड्स वाहनाची तपासणी केली असता त्यात काही बॅटरी आढळून आल्या. वाहनातील दोघांची चौकशी केली असता आणखी तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या बॅटऱ्याही त्यांनी दाखवल्या. पोलिसांनी दोघांना अटक करून चोरीच्या 12 बॅटऱ्या जप्त केल्या. चोरीसाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
अटक केलेल्यांकडून 138000/- रुपयांच्या एकूण 12 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या असून चोरीमध्ये वापरलेले 2,00,000 रुपये किमतीचे टाटा एसई मिनी गुड्स वाहनही जप्त करण्यात आले आहे.
बेळगावचे पोलीस अधीक्षक संजीव, एम. पाटील, अपर पोलिस अधीक्षक एम. वेणुगोपाल, पोलीस उपअधीक्षक अथणी उपविभाग श्रीपाद, हारुगेरी मंडळ निरीक्षक रविचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरी पोलीस स्टेशन पीएसआय जी. एस. उप्पार, आर. आर. कंगनोळ, कु. सी. डी. गंगावती व कर्मचारी आर. पी. कंबेकरी. सागर कांबळे, जी. एल. होसट्टी, एच. आर. अंची, पी. एम. सप्तसागर, जी. एन. कागवाड आणि विनोद ठकन्नावर आदींचे बेळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta