बेळगाव : तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची यंदाची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी सभासदांना बारा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शुक्रवारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी म्हणाले, तुकाराम को-ऑप. बँकेने सर्वसामान्यांना वेळेत कर्जपुरवठा केला आहे. कोरोना काळात कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाला मदत केली आहे. तसेच विविध उपक्रम देखील राबविले आहेत. याचबरोबर कोरोना काळात देखील नागरिकांना मदत देऊ केली आहे. नागरिकांना केलेल्या कर्ज पुरवठ्यात बँकेला 51 लाख 51 हजार 51 रुपये इतके निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना बारा टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगितले.
तसेच बँकेच्या ठेवीबद्दल आणि खेळत्या भांडवलाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच बँक सध्या परिस्थितीत प्रगतीपथावर असून नवीन एटीएम सुरु करण्याच्या प्रयत्नात असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, संचालक राजेंद्र पवार, अनंत जागळे, राजू मरवे, मोहन कंग्राळकर, संजय बाळेकुंद्री, मॅनेजर संकोच कुंदगोळकर यांच्यासहित सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
