बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने इंट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ कट्टीमनी रिटर्न शाईनचा स्थापना समारंभ तसेच मुलींचे क्षण आणि दत्तक घेणे दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता अधिकारी जिल्हा गव्हर्नर रोटरीयल नासिर बोरसादवाला, अध्यक्ष रोटेरियल कोमल कोल्लीमठ, असिस्टंट गव्हर्नर आरटीएन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रेणु कुलकर्णी केएलएस आयएमईआरचे संचालक डॉक्टर आरिफ शेख आणि क्लबचे सचिव रोटेरियन ऍड. विजयालक्ष्मी मन्नीकेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलींच्या शिक्षणाच्या निवारण्यासाठी गणेश भोसले आणि टीमची टीमच्या नेतृत्वाखाली केएलएस आयएमईआर त्याच्या विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना रुपये एक हजाराची शिष्यवृत्ती देऊ केली. याव्यतिरिक्त या कार्यक्रमात 2023- 24 या वर्षासाठी इंट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ कट्टीमनी लिटल शाईन या दोन इंट्रॅक्ट क्लबची स्थापना यांच्या करण्यात आली व क्लबच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. क्लबच्या यशात योगदान देणाऱ्या देणगीदारांचा आणि मार्गदर्शनाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर रोटरियन शितल चिलामी, सेंट जर्मन स्कूलचे चेअरमन श्री. उदय इदगल, लिटरसीचे रोटरियन पुष्पा पर्वतराव, विविध शाळांचे अधिकारी, विद्यार्थी व रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरियन मेघा दुदामी या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौम्या पाटील आणि वैशाली पिराळे यांनी केले.