Saturday , March 7 2026
Breaking News

विविध मागण्यांसाठी अभाविपची बेळगावात निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बेळगावात निदर्शने करण्यात आली.
सरकारने विद्यापीठांना पुरेसे अनुदान द्यावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कॉलेज विद्यार्थ्यांना सुसज्ज हॉस्टेल्स आणि तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावीत, बस पासचे समर्पक वितरण करावे आदी मागण्यांसाठी अभाविपच्या वतीने बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे आज, शुक्रवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना अभाविपचे जिल्हा संचालक प्रशांत शिल्लिकेरी यांनी सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालयानं पुरेसे अनुदान दिले पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यापीठांतील कर्मचारी कमतरतेची समस्या दूर करावी. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका लवकर कराव्यात. विद्यापीठ आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी सरकारी हॉस्टेल्समध्ये पुरेशा सुविधा द्याव्यात. बसपासचे व्यवस्थित वितरण न केल्याने शहरी व ग्रामीण दोन्ही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी बसपासचे समर्पक वितरण आणि बससेवा द्यावी आदी मागण्या त्यांनी केल्या.

अभाविपचे नेते सम्मेद कवटकोप्प यांनी सांगितले की, सरकारने महिलांना मोफत बसप्रवास योजना सुरु केली असली तरी त्यामुळे शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवास करण्यास जागाच मिळेनासे झाले आहे. परिणामी विध्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांसाठी समर्पक बससेवा पुरवावी, तसेच विद्यापीठे आई कॉलेजने देण्यात येणाऱ्या अनुदानाला कात्री लावू नये अन्यथा पुढील काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल.

निदर्शनांत चेतन हिरेमठ, संदीप दंडगल, कीर्ती शिवणकर, परशुराम मंजलकर, बालाजी जवळकर, राहुल अलकुंटे यांच्यासह अभाविपच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
अभाविपच्या निदर्शनांमुळे आरपीडी क्रॉस परिसरात काही काळ वाहतूक वळविण्यात आली होती. टिळकवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *