बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या महापुरुषांविषयी अत्यंत हीन पातळीवरून संतापजनक वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची ही वक्तव्ये देशविरोधी व समाजात द्वेष निर्माण करणारी आहेत. त्यांच्या निषेधार्थ कृतिशील पाऊल उचलण्यासाठी सोमवार दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सह्याद्री मल्टीस्टेट मल्टीपर्पज को आँप. सोसायटी, काळी आमराई येथे ही बैठक होणार आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील संस्था, संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. नागेश सातेरी यांनी केले आहे.