Tuesday , March 3 2026
Breaking News

गणेशोत्सव संदर्भात पालकमंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बेळगाव : गणेश महामंडळांच्या कोणकोणत्या मागण्या प्रशासनाकडे आहेत यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गणेश महामंडळ तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखालीच सदर बैठक होणार आहे.

या बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका आरोग्य, वनखाते, हेस्कॉम, अग्निशामक दल, सार्वजनिक बांधकाम यासह मध्यवर्ती गणेश महामंडळ आणि लोकमान्य गणेश महामंडळाचे पदाधिकारी गणेश मूर्तिकार, गणेश मंडळे आणि डॉल्बी असोसिएशन पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. मनपा प्रशासनाने सर्वांना नोटीस देत बैठकीची कल्पना दिली आहे.

बैठकीत विशेषतः हेस्कॉमकडून गणेश मंडळांना वीज बिलात मिळणारी सवलत, मंडळांना दिली जाणारी परवानगी, पावसाने खराब झालेले रस्ते आणि डॉल्बीच्या विषयावर चर्चा व्हायची शक्यता आहे. कारण दोन्ही महामंडळांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांची निवेदने दिली आहेत.

श्री गणेशोत्सव काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक सामग्री व उत्सवासाठी लागणाऱ्या सजावटी सामग्रीची दुकाने तसेच हॉटेल व्यवसायिकांना वेळेचे बंधन शिथिल करून देण्यात यावीत जेणेकरून सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही. विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महिला पोलीस बंदोबस्त ठेवून गर्दीच्या ठिकाणी महिला व बालकांना सहकार्य करावे. महिलांसाठी तात्पुरत्या त्यावेळी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जावी अश्या मागण्या देखील केल्या जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *