बेळगाव : भावना बिळगोजी यांनी पीएचडी सारखी पदवी संपादन करून हलगा गावांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. बीई सारखे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी प्राध्यापक ही से्वा करत असतानाच नोकरी बरोबरच आपले पुढील शिक्षणही सुरुवात ठेवून त्यांनी एमटेक व आता पीएचडी सारखी पदवी घेऊन त्या डॉक्टर बनल्या आहेत. यामुळे त्यांच्या या कार्याला आज हलगा गावातमध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे. त्यांचा आदर्श इतर स्त्रियांनी व विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा आहे, असे विचार धर्मराज सोसायटीचे अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी केले. धर्मराज सोसायटीच्या वतीने भावना बिळगोजी यांचा नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सदानंद बिळगोजी होते.
अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. यानंतर धर्मराज को ऑप सोसायटीच्या वतीने भावना बिळगोजी यांचा सुनिता बिळगोजी, संजीवनी शिंदे, सरिता संताजी, लक्ष्मी धामणेकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेट देऊन धर्मराज सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धर्मराज सोसायटीचे अध्यक्ष सदानंद बिळगोजी, उपाध्यक्ष बाळाराम संताजी, संचालक दयानंद शिंदे, प्रकाश हेब्बाजी, उमेश डुकरे, धाकलू बिळगोजी, कृष्णा मोरे, अण्णाप्पा माळीवाळ, अनिल शिंदे, मनोहर संताजी, गीता कानोजी, राणी बिळगोजी, लक्ष्मी धामणेकर, सुनिता बिळगोजी, सरिता संताजी, संजीवनी शिंदे, वर्षा मडिवाळ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta