
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या एका गाईला सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवदान देऊन तिची रवानगी गो -शाळेत केल्याची घटना आज बुधवार सकाळी घडली.
शहरातील गांधीनगर फ्रुट मार्केटनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक गाय जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, सुरज आणि गोरक्षक निलेश हिरेहोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दुभाजका शेजारी पडून असलेल्या त्या गाईला उपचार आणि आश्रयासाठी महापालिकेच्या गोशाळेत हलविले. या कामी उपरोक्त सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. आणि माळ मारुती पोलिसांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta