बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित झोनल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तुंग असे यश संपादन केले आहे.. शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उत्तम अशी कामगिरी केली आहे. बुद्धिबळ क्रीडा प्रकारात परम पाटील, अजिंक्य देसाई, रितेश मुचंडी, वैजनाथ पाटील, मनाली बराटे, साची पवार, रावी कोटबागे, अनुष्का पाटील यांची तालुकास्तरासाठी निवड झाली आहे. मुलांच्या खो-खो संघाने भांदूर गल्ली ७ नंबर शाळेच्या विद्यार्थ्यांना पराभूत करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर मुलांच्या कबड्डी संघाने चव्हाट गल्ली शाळा नंबर-५ या संघाला पराभूत करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या थ्रोबॉल संघाने कॅन्टोन्मेंट शाळेचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. या सर्व विद्यार्थ्यांची व संघांची तालुकास्तरासाठी निवड झाली आहे.. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेची क्रीडा शिक्षक दत्ता पाटील, महेश हगिदळे, पूजा संताची, श्रीधर बेन्नाळकर व योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, एन. सी. उडकेकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta