Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा महिला, युवक, युवती, उद्योजक व्यावसायिक मेळावा उद्या

Spread the love

 

बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उद्या मंगळवार दि 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मराठा महिला, युवक, युवती आणि उद्योजक व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे

गणेश कॉलनी, छ. संभाजीनगर वडगाव येथील मराठा सभागृहात शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून गडहिंग्लजचे शिवव्याख्याते प्रा. पी. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत. याखेरीज म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष आणि म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील आणि मराठा एकता संघटना बेळगावचे अध्यक्ष नारायण धनुचे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. मराठा समाजातील महिला, युवक, युवती, उद्योजकांसाठीचा हा मार्गदर्शनपर व्यावसायिक मेळावा उद्या मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर शिव भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी मराठा समाजातील महिला, युवक, युवती आणि उद्योजकांनी या मेळाव्याचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *