बेळगाव : दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी श्री परमज्योति अम्मांचा वाढदिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीच्या वतीने येथील परमज्योति श्री अम्माभगवान ध्यानमंदिर, सदाशिवनगर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून भक्तांनी 3.30च्या आत हजर रहावे, बरोबर 4 वाजता आरती होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल.
प्रथम कलशपूजा होईल आणि त्यानंतर अम्माभगवान भजन संकीर्तन कार्यक्रम होईल. भजन कार्यक्रम झाल्यानंतर विश्वगुरू कार्यक्रम होणार आहे यावेळी भक्तांना सोमा दीक्षा आणि स्पर्श दिक्षेचा लाभ मिळणार आहे.
यावेळी दासाजी मार्गदर्शन करतील.
शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल असे अम्माभगवान सेवा समितीच्या वतीने कळवण्यात आले असून जास्तीतजास्त भक्तांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta