Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव तालुक्याचे विभाजन होणार : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्याचे बेळगाव शहर तालुका आणि बेळगाव ग्रामीण तालुका असे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले की, बेळगाव तालुक्याचे विभाजन होणार हे निश्‍चित असले तरी विभाजन कसे करायचे हे अधिकारी ठरवतील. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत जिल्ह्यातील आमदारांशी यापूर्वीच चर्चेची फेरी झाली आहे. चिक्कोडी आणि गोकाक हे दोन्ह जिल्हे करण्याची मागणी आम्ही केली आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून तीन जिल्हे करण्याचा प्रस्ताव आहे, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *