बेळगाव : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत प्रवेश प्रक्रिया 2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबीर बेळगाव येथे पार पडले. सदरच्या शिबिराचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. संजय कुबल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबीराचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. के. बी. पाटील यांनी केले. दूरशिक्षणाअंतर्गत असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचे सविस्तर मार्गदर्शन डॉ. पाटील यांनी केले. दूरशिक्षणाच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्चशिक्षणाची सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन डॉ. कुबल यांनी केले.
पुढे ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीच सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असेल. तसेच दूरशिक्षण अंतर्गत दुहेरी पदवीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्गत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी आपल्या दारी आल्याचे प्रतिपादन बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. मालोजी अष्टेकर यांनी केले. तसेच या कार्यशाळेस खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. दिगंबर पाटील उपस्थित होते. सदर मार्गदर्शन शिबीरामध्ये डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. सचिन भोसले, डॉ. मुफीद मुजावर व डॉ. सुशांत माने यांनी विविध अभ्यासक्रमाबद्दल व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंबधी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नाचे निरसन केले. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य श्री. एम. जी. पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार श्री. शिवराज पाटील यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta