बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरजवळच्या जुन्या तलावात दोन मृतदेह आढळून आले आहेत. बुडालेला मृतदेहांमध्ये एक पुरुष व एक स्त्री असल्याचे प्राथमिक दृष्ट्या आढळून येत आहे.
बुधवार पहाटे कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावामध्ये दररोज मुलं पोहायला जातात त्या पोहणाऱ्या मुलांना दोन मृतदेह पाण्यावरून तरंगत असल्याचे दिसले त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
खडे बाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलावाला भेट देत माहिती घेतली सदर मृतदेह कुणाचे आहेत त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta