
बेळगाव : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या “माझी माती आणि माझा देश” अभियानांतर्गत बेळगाव महानगरपालिकेतर्फे किल्ला येथील तलाव परिसरात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून देणाऱ्या स्मारकाचा अनावरण समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, महापौर शोभा सोमनाचे, खासदार मंगला अंगडी, उपमहापौर रेश्मा पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापालिकेचे नगरसेवक, पालिकेचे शाखाप्रमुख, जिल्हास्तरीय अधिकारी, पौरकार्मिक, उद्यानाचे माळी, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते. स्मारकाच्या अनावरानंतरच त्याच्या आवारात “माझी माती माझा देश” अभियानांतर्गत अमृत वाटिका निर्मितीचा शुभारंभ महापौर शोभा सोमनाचे आणि खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि नगरसेवकांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर अमृत वाटिकेची उभारणी वन खात्याच्या सहकार्याने केली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta