Tuesday , March 3 2026
Breaking News

चव्हाट गल्लीतील देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी चव्हाट गल्लीतील सर्व देवस्थानाला पूजा व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम गल्लीतील पंचमंडळ, महिला मंडळ, युवा वर्ग व सर्व भक्त मंडळ मिळून हा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी पार पाडतात. आज दिनांक 21 रोजी सकाळी 9.00 वाजता पहिला सोमवार निमित्त चव्हाटा मंदिर येथून पूजा करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ढोरवाडा येथे चव्हाटा मंदिरात नंतर कल्याण चौक येथे गणेश मंदिर, त्यानंतर श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवदादा सासणकाटी (देवघर) त्यानंतर मारुती मंदिरात पूजा करून हा कार्यक्रम समाप्त करण्यात आला.
गल्लीतील सर्व नागरिक महिला मंडळ व भक्त मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *