Wednesday , March 4 2026
Breaking News

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवार दि. 27 रोजी अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील या दोन गटात निवडणूक होणार आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेली बोलणी आज फिस्कटली आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वेगवेगळे पॅनेल तयार केले.

तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनेलची बैठक सदाशिवनगर येथे पार पडली. त्यानंतर संचालक आर. आय. पाटील आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी आपल्या पॅनेलची बाजू मांडताना निवडणुकीस सामोरे जात असल्याचे माध्यमांसमोर सांगितले. संचालक मंडळाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. पण, तानाजी पाटील यांनाच पॅनेलमध्ये घेण्यात येऊ नये अशी भूमिका त्या गटाने घेतली त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही वेगळा पॅनेल करून लढवण्याचे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले.

रामभाऊ पोतदार, गुरूअण्णा कुट्रे आणि शट्टुप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेला हा कारखाना शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी पॅनेल करून ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती आर. आय. पाटील आणि शिवाजी सुंठकर यांनी संयुक्तरित्या माध्यमांना दिली.

अविनाश रामभाऊ पोतदार पॅनेल
या पॅनेलमध्ये सामान्य गटातून अनिल पावशे, अनिल कुट्रे, अविनाश पोतदार, अशोक नाईक, बसवंत मायाण्णाचे, बाबुराव पिंगट, यल्लाप्पा रेमाणाचे, अनुसुचित जाती गटातून चेतक कांबळे, अनुसुचित जमाती गटातून सत्यप्पा मुचंडी, ओबीसी अ वर्गातून उदय सिद्धण्णावर, ओबीसी ब वर्गातून मनोहर हुक्केरीकर, महिला वर्गातून निलीमा पावशे, वसुधा म्हाळोजी, सहकारी संस्था गटातून प्रदीप अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक वर्गातून भरत शानभाग.

शेतकरी बचाव पॅनेल
सामान्य गटातून जोतिबा आंबोळकर, भाऊराव पाटील, मल्लाप्पा पाटील, रामचंद्र (आर. आय.) पाटील, शिवाजी कुट्रे, सिद्धाप्पा टुमरी, संभाजी (एस. एल.) चौगुले, अनुसूचित जाती गटातून परशराम कोलकार, अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक, ओबीसी अ गटातून बसवराज गाणीगेर, ओबीसी ब गटातून तानाजी पाटील, महिला गटातून वनिता अगसगेकर, वैष्णवी मुळीक, सहकार संस्था गटातून सुनील अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक गटातून बाबासाहेब भेकणे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *