बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 या स्पर्धेत चांगली चमक दाखवत चार पदकांची कमाई केली.
2 री कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 ही स्पर्धा गेल्या 18 ते 20 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथे पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये 13 जिल्ह्यातील 650 हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या स्केटर्सनी स्पीड स्केटिंगमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले. पदक विजेत्या स्केटरची नांव सौरभ साळोखे (1 सुवर्ण), अनघा जोशी (2 रौप्य) आणि अवनीश कामण्णावर (1 कांस्य) अशी आहेत. हे सर्व स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करतात. त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गगणे आणि अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन तसेच डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, के.आर.एस.ए. सरचिटणीस इंदुधर सीताराम आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta