बेळगाव : बेळगाव तालुका सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बेळगाव तालुका प्राथमिक आणि माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या हॉकी स्पर्धेत एम. आर. भंडारी हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी टिळकवाडीतील सुभाष चंद्र बोस मैदानामध्ये संपन्न झाल्या. यामध्ये एस. के. ई. सोसायटीच्या एम. आर. भंडारी शाळेने प्राथमिक मुलांच्या गटांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कॅम्प विभागाच्या मदनी हायस्कूल संघाचा 2-1 ने पराभव केला. यामध्ये कार्तिक पाटील व शंकर हुबळी याने प्रत्येकी 1 गोल नोंदविला. तसेच माध्यमिक शालेय मुलांच्या गटांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात एम. आर. भंडारी शाळेच्या विद्यार्थ्याने शहापूर मधील ज्ञान मंदिर हायस्कूलचा 4-0 ने पराभव करत विजय संपादन केला. यामध्ये भैरू अरेर व प्रवीण झुटपणावर यांनी 2 गोल नोंदविले. शाळेमधील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एस. डी. नायक, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सदाशिव वैजनाथ मठ तसेच शाळेचे क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक सुधाकर चाळके उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta