मराठा मंडळ अन्यायग्रस्त इंग्रजी शिक्षिका यांचे प्रत्यूत्तर
बेळगाव : मराठा मंडळाने दिलेल्या स्पष्टीकरणाला प्रतिक्रिया देताना अन्यायग्रस्त अक्षता नायक मोरे यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे साफ खोटे बोलत आहेत. आश्वासन एकदा नाही तर अनेकदा वारंवार दिले होते. मुलाखतीत नियमांचे नीट पालन केले नाही. आपण मेरीटमध्ये असतानादेखील अन्याय केला. मुलाखतीच्या वेळी जाणूनबुजून कागदपत्रात फेरफार केली. मुलाखतीमध्ये 15 गुण असतात. त्यामध्ये सरकारी अधिकारीचे केवळ 5 गुण असतात. आणि राहिलेल्या 10 गुणांपैकी 5 गुण मॅनेजमेंटच्यावतीने एका ऑफीसमधील अकौंटंट व 5 गुणांसाठी विषय तज्ज्ञ म्हणून यांच्याच शाळेतील अन्य एका शिक्षकांना बसविले होते. त्यामुळे ही मुलाखत न्यायवादी नव्हतीच मुळी. तसेच पारदर्शी तर अजिबातच नव्हती. तेव्हा ही मुलाखत पुन्हा एकवार पारदर्शीपणे न्यायाने झाली पाहिजे. सर्व कागदपत्रांची नीट तपासणी झाली पाहिजे. गुणवत्तेमध्ये आपण अन्य उमेदवारांच्या तुलनेत टाॅपर आहे. शिवाय आपण फूलटाईम सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निष्ठेने जी इंग्रजी पोस्ट सँक्शन झाले त्याच जागेवर 9 वर्षे काम केले आहे. तर ज्यांना ही पोस्ट देऊ केलेत ते काॅलेजमध्ये पार्टटाईम काम करतात. काॅलेजमध्ये सकाळी 9.30 ते 12 यावेळेत केवळ दोन तास घेऊन अन्य दोन संस्थांमधूनही पार्टटाईम काम करतात. तर मग ते फूलटाईमर कसे? शिवाय स्वतःची शाळाही चालवितात.
पैशांच्या गैरव्यवहारातूनच हे सर्व घडते आहे. शिवाय सर्वच बेळगाव व खानापूरमधील 20 पोस्ट नेमणूकांमध्ये लाखो रूपयांचा गैरकारभार झालेला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून 32 ते 35 लाख घेतले आहेत. त्या सर्व 20 पोस्टही संमतीविना रोखल्या पाहिजेत व त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या सर्व उमेदवारांची आधार लिंकद्वारे बँक खाती तपासल्यास आताच त्यांनी लाखो रूपयांचे कर्ज कशासाठी घेतले आहेत, हे सत्य उजेडात येईल. शिवाय काही जणांचे पैसे देवाणघेवाण संदर्भातील रिकाॅर्डिंगसुध्दा आपल्याकडे आहेत. वेळ आल्यास तेही दाखवू, असे त्या म्हणाल्या. आपण ब्राह्मण असल्यानेच त्यांनी असा घोर अन्याय केल्याचेही त्यांनी निष्ठून सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta