Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवबसव नगर येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथील स्पंदन हॉस्पिटल जवळ बुधवारी रात्री एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय 30 रा. रामनगर वड्डरवाडी) असे मृताचे नाव आहे.

घटनस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार युवकाचा हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि दगडाने ठेचून त्याचा खून करून पसार झाले. घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी धाव घेतली असून त्या परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरात नाकाबंदी केली असून चौकशी सुरु केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *