Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेचे यश

Spread the love

 

बेळगाव : दि. 1/9/2023 रोजी मराठी प्राथमिक शाळा राजहंसगड येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर व लोवर प्राथमिक शाळेच्या विधार्थांनी दैदिप्यमान यश संपादन केले. त्यात पहिली ते सातवीमध्ये भक्तीगीत प्रथम शिवण्या मुचंडी तर दुर्वा पाटील द्वितीय. कन्नड कंठ पाठ द्वितीय आरुष बिजगरकर तर सेजल घाडी द्वितीय. कथाकथनमध्ये श्रावणी पाटील आणि भक्ती बिर्जे तृतीय. लघु संगीतमध्ये आराध्य गुंजिकर आणि भक्ती बिर्जे तृतीय आणि धार्मिक पठणमध्ये सान्वी बेडरे तृतीय वेशभूषामध्ये विधिशा मजुकर तृतीय या विधार्थांनी यश प्राप्त केले.
सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक आय. बी. राऊत, नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील, दीपा हट्टीकर, स्नेहल मजुकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेंच संस्थेचे, अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *