बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने आज खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना हॉकी साहित्याचे वितरण करण्यात आले. हा वितरण सोहळा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
आज सकाळी ताराराणी हायस्कूलच्या प्रांगणात मुख्याध्यापक राहुल जाधव, शिक्षिका अश्विनी पाटील व विद्यालयाच्या सुमारे 50 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव सुधाकर चाळके, खजिनदार मनोहर पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रकाश कालकुंद्रीकर, गणपत गावडे आदी सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी बेळगाव संघटनेची माहिती दिली. सचिव सुधाकर चाळके यांनी हॉकी खेळाविषयी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले हॉकी हा खेळ राष्ट्रीय स्तरावर खेळला जातो यामुळे विद्यार्थ्यांनी या खेळाकडे गांभीर्याने लक्ष देऊन खेळल्यास राष्ट्रीय स्तरावर आपण पोहोचू शकतो असे सांगितले.
शिक्षिका अश्विनी पाटील यांनी हॉकी बेळगावचे आभार मानले तसेच ताराराणी विद्यालयातर्फे मुलींची हॉकी टीम नक्की तयार करू व राष्ट्रीय स्तरावर पोहोचू असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta