बेळगाव : राज्य सरकारने राज्यातील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. यामध्ये बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस उपायुक्त म्हणून 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य गृह खात्याने उपायुक्त शेखर यांची अन्यत्र बदली करून त्यांच्या जागेवर आयपीएस अधिकारी (केएन -2019) रोहन जगदीश यांची नियुक्ती केली आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी पोलीस उपायुक्त शेखर यांनी या पदाचा अधिकार स्वीकारला होता वर्षपूर्ती होण्यापूर्वीच सरकारने यांची बदली करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta