बेळगाव : धारवाड सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय हँडबॉल स्पर्धेत माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा शाळेने उपविजेतेपद पटकाविले.
धारवाड येथील मल्लसजन व्यायाम शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या विभागीय हँडबॉल माध्यमिक मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात संत मीरा बेळगांवने धारवाड जिल्ह्याचा 10-9 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम लढतीत हावेरी जिल्हांने संत मीरा बेळगांवचा 13-9 अशा गोल फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले, तर संत मीरा शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून धारवाडचे डीडीपीआय एस एस गटशिक्षणाधिकारी अशोक सिंदगी, निवृत्त धारवाड जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी बी जी तोगरी, गिरीष मठपती या मान्यवरांचे हस्ते उपविजेत्या संतमीरा संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या संघात अभिषेक गिरीगौडर, लिंगेश नाईक, निशांत शेट्टी, सिध्दांत वर्मा, प्रणव चौगुले, प्रसाद दिंडे विघ्नेश दिवटे श्रीनाथ सांबंरेकर, प्रथमेश शहापूरकर या खेळाडूंचा संघात समावेश होता. शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील मयुरी पिंगट, प्रशिक्षक यश पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दत्तकदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे व पालक वर्गांचे प्रोत्साहान लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta