बेळगाव : बेळगावातील रिद्धीव्हिजन केबलच्या संचालिका व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या निशा नागेश छाब्रिया यांचे आज मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी उद्योगपती नागेश, पुत्र सुमुख, कन्या रिद्धी, सून, जावई असा परिवार आहे.
बेळगावात रिद्धीव्हिजन या नावाने पहिली केबलसेवा सुरु करण्यात पती नागेश छाब्रिया यांच्या समवेत निशा छाब्रिया यांचाही मोठा सहभाग होता. धडाडीने हा व्यवसाय सुरु करून त्याचा देशाच्या अनेक भागात विस्तार करण्यात निशा व नागेश छाब्रिया दांपत्याचे मोठे योगदान आहे. याशिवाय निशा या बेळगाव परिसरात अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. त्यांच्या निधनाने एक करारी, कर्तव्यनिष्ठ आणि तितक्याच प्रेमळ व्यक्तिमत्वाला बेळगावकर मुकले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta