बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जुनी असलेली मागणी पूर्ण झालेली असून धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले असल्याची माहिती राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली.
खासदार ईराण्णा कडाडी यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रेल्वे क्रमांक 17302 बेळगावहून सायंकाळी 7:45 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 7:10 वाजता म्हैसूरला पोहोचेल.
बेळगाव गाडी क्रमांक 17301 म्हैसूरहून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता बेळगावला पोहोचेल.
बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धावण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
माझ्या विनंतीला प्रतिसाद देत बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो असेही त्यांनी नमूद केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta