Saturday , December 13 2025
Breaking News

नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे २४ सप्टेंबरला विविध स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूरतर्फे रविवार दि. २४ रोजी क्रीडा क्रेंदाच्या वार्षिक कार्यक्रमांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटक म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर व उपाध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहेत. या शिवाय नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, नवहिंद मल्टिपर्पजचे दशरथ पाटील, प्रियदर्शीनी सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, नवहिंद महिला, प्रबोधन केंद्राच्या नम्रता पाटील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर असतील.

१) बुद्धिबळ स्पर्धा : प्राथमिक गट- बक्षिसे अनुक्रमे १५०० व १००० रुपये माध्यमिक गट- बक्षिसे अनुक्रमे २००० व १५०० रुपये. २) भाषण स्पर्धा प्राथमिक गट विषय – खेळाचे महत्त्व, वेळ – तीन मिनिटे. बक्षिसे अनुक्रमे १०००, ७००, ५००. माध्यमिक गट- विषय – सेंद्रिय शेती काळाची गरज, वेळ : पाच मिनिटे, बक्षिसे अनुक्रमे १५००, १०००, ७०० रुपये. ३) गायन स्पर्धा प्राथमिक गट, बक्षिसे अनुक्रमे १०००, ७००, ५००, माध्यमिक गट – बक्षिसे अनुक्रमे १५००, १०००, ७०० रुपये. ४) रांगोळी स्पर्धा- प्राथमिक गट (फ्री हँड) – बक्षिसे अनुक्रमे १०००, ७००, ५००, ३००, २०० रुपये. माध्यमिक गट – बक्षिसे अनुक्रमे १५००, १०००, ७००, ५००, ३०० रुपये. स्पर्धकांनी आपला बुद्धिबळ सेट आणावयाचा आहे. गायन स्पर्धेमध्ये भावगीत किंवा भक्तिगीत सादर करणे गरजेचे आहे. स्पर्धकांनी येताना मुख्याध्यापकांच्या सहीचे ओळखपत्र आणावे. अधिक माहितीसाठी नवहिंद क्रीडा केंद्राशी संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *