बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव तालुकास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावताना मच्छे येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मच्छे या शाळेच्या मुलांच्या थ्रो बॉल संघाने काल शुक्रवारी निर्मळनगर मोदगा येथे झालेल्या थ्रो बॉल स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर यशाबद्दल या संघातील खेळाडूंची सर्वत्र अभिनंदन होत आहे. या संघाला शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. देसाई, क्रीडा शिक्षक एस. जी. देवडी, सुरज देसाई, के. के. बेळगावकर, बी. व्ही. शेळके, सुनील बागेवाडी तसेच इतर शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मच्छेचा संघ आता खानापूर येथे होणाऱ्या जिल्हा पातळीवरील स्पर्धेत भाग घेणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta