बेळगाव : बेळगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरताना एका कारने पेट घेतला आहे. पेट्रोल पंपाच्या आवारात कारच्या समोरील भागाला अचानक आग लागल्याने मोठा अनर्थ घडला असता. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या स्वीफ्ट कारला आग लागली, कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने भीषण अपघात टळला.
आग लागताचं तितक्यात कारमधील व्यक्ती खाली उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आग लागताचं आग विझवण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. त्यानंतर स्थानिक आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारगाडी पंपाबाहेर रस्त्यावर आणली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांच्या वेळीच सजगतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे दिसत आहे. अन्यथा पेट्रोलपंपाला आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सदर घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. बेळगावच्या एपीएमसी पोलिस स्थानकात ही घटना नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta