बेळगाव : उच्च न्यायालयाने आदेश बजावूनही सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्याकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक देणाऱ्या महापालिकेने आता व्यापारी आस्थापनांच्या नामफलकांचे कानडीकरण करण्याचा विडा उचलला आहे. दुकानांच्या नामफलकांवर ६० टक्के जागेत कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा, असे पत्रक आयुक्त अशोक दुडगंटी यांनी काढले आहे.
स्थानिक लोकांच्या भाषेत व्यवहार करण्याचा, दुकानांवर त्यांच्या भाषेत नामफलक उभारण्याचा अधिकार असतानाही कानडीकरणाचा अट्टाहास करण्यात येत आहे. महापालिकेच्या व्याप्तीतील दुकानांवर कन्नड भाषेत नामफलक उभारण्यात यावेत. कन्नड भाषेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे. ६० टक्के जागेत कन्नड भाषेतून नामफलक लावण्यात यावे, अशी राज्य सरकारची अधिसूचना आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकानदारांनी कन्नडमध्येच नामफलक उभारावेत. ६० टक्क्यांनंतर उरलेल्या जागेत इतर भाषेत लिहिण्यास मुभा आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन करावे, अशा सूचना आयुक्त दुडगंटी यांनी पत्रकाद्वारे केल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta