बेळगाव : दोन दिवसापूर्वी रेल्वेत बेशुद्ध अवस्थेत आल्यानंतर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेश खंडवा येथील नऊ प्रवाशांचा तब्येतीची विचारपूस करत माजी महापौर विजय मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
पर राज्यातील कामगार गोव्याहून मध्य प्रदेशकडे जात असते वेळी गोवा एक्सप्रेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्या सर्व जणांच्या तब्येतीची विचारपूस करून रुग्णांना फळे वाटप केली आणि लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मोरे यांनी रेल्वे पोलिसांकडे सर्वांना त्यांच्या गावी सुखरूपपणे पाठवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. यावेळी रेल्वे पोलीस अधिकारी आणि सिविल हॉस्पिटल हॉस्पिटलचे अधिकारी वर्ग, अलन मोरे, गंगाधर पाटील, संजय मालवणकर, संतोष दरेकर व इतर मित्र मंडळ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta