खानापूर : रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता माहेश्वरी अंध विद्यालय क्रीडांगण बेळगाव या ठिकाणी बेळगाव जिल्हा उपनिर्देशक महिला बालकल्याण व ज्येष्ठ नागरिक यांचे निर्देशानुसार प्रशासनामार्फत वरील स्पर्धा नियोजित केले आहे. तसेच बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना व बेळगाव जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील उपघटक ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयोजनातून व बालकल्याण व ज्येष्ठ नागरिक कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य यांच्या उपस्थितीत या स्पर्धा आयोजित केल्या आहेत
या स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिक सभासद असणाऱ्या सर्व सदस्यांना भाग घेता येणार आहे. याची नोंद तालुकास्तरीय करून निश्चित यादीनुसार बेळगाव जिल्हा प्रशासन मार्फत यादी जाहीर केली जाणार आहे.
सांस्कृतिक विभागामध्ये गायन चित्रकला एकपात्री अभिनय मिमिक्री अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धा 100 मी. चालणे 100मी. धावणे बादलीमध्ये रिंग फेकणे इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अधिक माहितीसाठी तालुकास्तरीय अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्याशी संपर्क साधून अधिक समजून घेता येईल. या ठिकाणी आपले आधार कार्ड व संघटनेचे नोंदणी कार्ड आणायचे आहे.
या स्पर्धा विश्व ज्येष्ठ नागरिकदिना निमित्त कर्नाटक राज्य सरकारमार्फत संपन्न होत आहे.
स्पर्धेमध्ये प्रशस्तीपत्र पेमेंटों व मानधन देऊन गौरविण्यात येणार आहे. भाग घेतलेल्या स्पर्धकाला अल्पोपहार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाणार आहे, तरी सर्वांनी योग्यवेळी उपस्थित राहून कार्यास सहकार्य करावे असे कळविण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta