बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निकृष्ट दर्जाच्या कामासाठी एल अँड टी कंपनीला २१ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बेळगावला सतत पिण्याचे पाणी पुरविण्याची व इतर कामांची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीने 2021-2025 ची निविदा प्राप्त केली होती. मात्र सध्या तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही केवळ ६० टक्केच काम झाले आहे. निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण न करणे, निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोपही ऐकायला मिळत आहे. या संदर्भात महापालिकेने कंपनीवर मोठा दंड ठोठावला आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी 12 सप्टेंबरला कंपनीला कारणासह पत्र पाठवल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta