बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी ठीक सकाळी 11.30 वाजता शंकर-पार्वती मंगल कार्यालय, उचगाव -कोवाड रोड उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. जवाहरराव शंकरराव देसाई यांनी दिली.
साहित्यभूषण पुरस्कार : स्वरूपा गणपतराव इनामदार, शिक्षण भूषण पुरस्कार : श्री. सुनील गणपतराव चिगुळकर, सेवाभूषण पुरस्कार : विलास रामचंद्र पवार, समाजभूषण पुरस्कार : श्री. युवराज नागोजीराव कदम, उचगाव भूषण पुरस्कार : श्री. मनोज प्रभाकरराव पावशे तसेच उचगाव केंद्रात दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सभासदांच्या मुलांचा गुणगौरव सत्कार, विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्यांचा सत्कार, नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta