बेळगाव : यंदा गणेश चतुर्थीला वेगळाच रंग आला आहे. प्रत्येक मंडळातील गणेश मुर्ती किती उंच आणि कोणत्या स्वरूपात असते, तेथील मंडपातील सजावट कशी असते हे पाहायला भाविकांची गर्दी होते. अशीच गर्दी आजही बेळगावातील धर्मवीर संभाजीराजे चौकात गुरुवारी रात्री झाली जेव्हा बेळगावचा राजाचे आगमन शहरात झाले. तेव्हा बेळगावचा राजाची गणेश मुर्ती आणि मुर्ती पाहण्यासाठी झालेली ही भाविकाच्या गर्दीत मोठ्या दिमाखात पार पडला.
सीमाभागातील आराध्य दैवत मानले जाणाऱ्या श्री गणेशाच्या आगमनाची जयत तयारी सुरू झाली आहे. यावर्षी शहरातील मोठे मंडळे आपल्या लाडक्या श्री गणेशाच्या भव्य मूर्तीला घेऊन मंडळात स्थापित करण्यासाठी तयारीला लागले आहे.
गणेश चतुर्थी निमित्त राज्यभर मोठ्या प्रमाणावर श्री गणेशाची स्थापना करण्यात येते. त्यातच शहरातही मोठ्या प्रमाणावर छोटी मोठी मंडळी आहेत.
श्री ची स्थापना करण्यासाठी अवघे चार दिवस राहिले असताना मोठ्या मुर्त्या शहरात येण्यास सुरुवात झाली आहे. 19 सप्टेंबर रोजी उद्यमबाग रोड वरून बेळगावचा राजा या मूर्तीला नेण्यात आले. त्यावेळी मंडळाचे सदस्य तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे ते आकर्षणाचे केंद्र बनले होते. बेळगावच्या राजाचे पूजन व मूर्तिकार आहेर पंच प्रताप मोहिते यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, उत्तम नाकाडी, विनायक पवार, सरचिटणीस आनंद आपटेकर, सत्यम नाईक, उपाध्यक्ष जोतिबा पवार, निशांत कुडे, वृषभ मोहिते, किसन रेडेकर, विशाल मुचंडी, संदीप मोहिते, सुधीर धामणेकर, रोहन जाधव, लक्ष्मण किल्लेकर, महिंद्र पवार, विशाल गुंडकल, सौरभ बामणे, निलेश गुंडकल, प्रभाकर गुंडकल, जोतिबा किल्लेकर, निखिल पाटील, आकाश कुकडोळकर, पवन किल्लेकर, जोतिबा नाईक, अनंत हंगीरगेकर, प्रियेश गौडाडकर, यासह गल्लीतील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta