गोकाक : जग 21 व्या शतकात आहे. माणूस चंद्रावर पोहचला असून लवकरच सूर्याकडे झेपावण्याची महत्वकांक्षा बाळगून आहे. मात्र पृथ्वीतलावर आज देखील अमावस्या आली की रस्त्याच्या कोपऱ्यात लिंबू, नारळ, मिरची, गुलालबुक्का, भोपळा आदी प्रकार पाहायला मिळतात. गंडेदोरे देऊन भाबड्या माणसांच्या भावनांशी खेळणारे महाभागही काही कमी नाहीत. मात्र पिठोरी आमवास्येदिवशी चक्क घरासमोरील अंगणात कवटी ठेवून त्यावर कुंकू, गुलाल लावून करणीबाधा केल्याचा भयंकर प्रकार बेळगाव काल घडला आहे.
पिठोरी अमावस्येनिमित्त भयंकर जादूटोणा करण्याचा प्रकार गोकाक तालुक्यातील सवळगी या गावात घडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल गुरुवारी अमावस्या होती. सवळगी गावातील बसव्वा चन्नय्या मठपती यांच्या घरासमोर मध्यरात्रीच्या सुमारास माणसाची कवटी, लिंबू, गंडेदोरे, गुलालबुक्का आदी साहित्य ठेवून त्यावर मठपती कुटुंबियांची नावे लिहिल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
रात्रीच्या अंधारात काळीजादूच्या प्रकारामुळे सवळगी गावातील नागरिक हादरले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta