बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप (मेन)च्या वतीने दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी जायंट्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात पोहण्याच्या स्पर्धेने करण्यात आली.
17 ते 23 सप्टेंबर हा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. आज सकाळी दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत गोवावेस येथील महापालिकेच्या स्विमिंग पुलावर चाललेल्या या स्पर्धेत विविध गटामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धक बेळगाव बरोबरच कारवार, मंगलोर, हुबळी येथूनही आले होते.
स्वर्गीय तात्या पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आबा स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने जायंट्स ग्रुपने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
याप्रसंगी जायंट्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास पवार यांनी केले. स्वागत सचिव लक्ष्मण शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्विमर श्री. मोहन सप्रे होते. प्रमुख पाहुणे आबा क्लबचे अध्यक्ष शीतल हुलबत्ते होते. जायंट्सचे अध्यक्ष सुनील मुतगेकर यांनी जायंट्स कार्याची माहिती दिली. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सप्ताहाचे उद्घाटन झाल्याची घोषित करण्यात आले.
आभार प्रदर्शन सचिव लक्ष्मण शिंदे यांनी केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta