Thursday , September 19 2024
Breaking News

गणरायाच्या स्वागतासाठी लगबग; बाजारात गर्दी

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपल्याने उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी झाली होती. विशेषत: सजावट, आरास आणि पूजेच्या साहित्याला मागणी वाढली होती. त्यामुळे बाजारात गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामुळे गणेशोत्सव दारात खरेदी जोरात असे चित्र पाहावयास मिळाले. लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्र तयारीला वेग आल्याचे दिसत आहे. बाजारात विविध साहित्याची खरेदी वाढली आहे. विशेषत: सजावट, पूजेचे साहित्य, फळ, फुले, हार आदींना मागणी अधिक आहे. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, मेणसी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, किर्लोस्कर रोड, काकतीवेस, शनिवार खूट, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढली होती.

दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ

गणरायाच्या पूजेसाठी विविध प्रकारची फळे, फुले, कापूर, अगरबत्ती, हार-तुरे, विड्याची पाने, पूजेचे पाट, नाडापुडी, गुलाल, बदाम, खारीक यासह लाईट माळा, थर्माकोलचे मखर, दीपमाळ, रंगीबेरंगी पडदे, फेटे, मुकुट, मंडप, एलईडी बल्ब आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी झाली. गणेशोत्सव काळात नवीन साहित्य खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे सोन्या-चांदीच्या पेढ्या, इलेक्ट्रॉनिक दुकाने आणि कपड्यांच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. लाडक्या बाप्पाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी फटाक्यांची मागणीही वाढली आहे. यामध्ये भुईचक्र, बॉम्ब, फटाक्यांच्या माळा, सुरसुरी, पाऊस आदींची खरेदी होऊ लागली आहे.

बाजारात फळांची आवक

गणेशोत्सवासाठी बाजारात विविध फळांची आवक वाढली आहे. सफरचंद, चिकू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू, केळी, सीताफळ, नारळ आदी फळांना मागणी अधिक आहे. त्याबरोबरच पाच फळेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रविवारी शासकीय सुटी असल्याने कुटुंबासह नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. त्यामुळे बाजारात तोबा गर्दी झाली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडले.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *