बेळगाव : कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21आक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धा म्हैसूर येथे चामुंडेश्वरी मैदानावर होणार आहेत.
हाॅकी विभागात बेळगाव जिल्ह्यातून सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी महिला व पुरुष विभागातून निवड करण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी मेजर सय्यद हाॅकी मैदान, धोबी घाट, कॅम्प, बेळगाव येथे सकाळी 9.30 ते 4.30 पर्यंत होणार आहे. यासाठी इच्छुक खेळाडूनी आधार कार्ड, फोटो, बँक पासबुकसह हाॅकी बेळगावचे अध्यक्ष घुळाप्पा होसमणी व सचिव सुधाकर चाळके दूरध्वनी क्रमांक 9823425260 यांचेही संपर्क साधावा.