बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक साधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पी. आर. कदम होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वाहतूक व्यावसायिक विठ्ठल गवस, उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते.
प्रारंभी दुखवट्याचा ठराव मांडल्यानंतर पी. आर. कदम यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनंत लाड यांनी मागील सर्व साधारण सभेचे अहवाल वाचन केले. अशोक हलगेकर यांनी 2022-23 सालचा जमाखर्च सादर करून त्यास मंजुरी घेतली. यावेळी 2023-24 सालासाठी लेखा परीक्षक (C.A.) म्हणून मठपती व कंपनी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली .
यावेळी 2022-23 सालात आजीव सभासद झालेल्या मल्लिकार्जून सत्तीगेरी, अरूण काले, सतिश बांदिवडेकर, बाळकृष्ण तेरसे, भास्कर कदम, दयानंद भेंडीगेरी, ईश्वर पाटील व यल्लाप्पा पाटील यांच्या नावाना मंजुरी देण्यात आली.
प्रमुख पाहुणे या नात्याने विठ्ठल गवस यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत मोहन कारेकर, संजय पाटील, सुनिल मुतगेकर, शिवकुमार हिरेमठ, विश्वास पवार, विकास कलघटगी, मुकुंद महागावकर, उमेश पाटील, अविनाश पाटील,
यांनी भाग घेतला. अध्यक्ष पी. आर. कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लक्ष्मण शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शेवटी सुनील भोसले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta