
बेळगाव : लेले ग्राऊंडवर विद्युत तारा खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. हॅस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे लेले ग्राऊंड परिसरात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॅस्कॉमने याची दखल घ्यावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे.
लेले ग्राऊंडवर सकाळी फिरायला येतात. तसेच विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी लहान मुले, तरुण येत असतात. येथील विद्युत खांबावर उघड्यावर लोंबकळणाऱ्या तारा आहेत. संध्याकाळी या मैदानातील दिवे देखील खेळायला येणारी शाळकरी मुलेच चालु-बंद करतात. तेथील तारा आणि स्वीच उघडेच आहेत. थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर एखाद्याला विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडू शकते. या विद्युत खांबावरील स्वीच बोर्डला कव्हर होते पण अज्ञातांनी तो कव्हर चोरून नेल्या आहेत. तरी हॅस्कॉमने तात्काळ या ठिकाणी नवीन कव्हर बसवून उघड्यावर असणाऱ्या विजेच्या तारा हटवाव्यात तसेच उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांपासून सावधानतेचा बोर्ड देखील त्या ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta