बेळगाव : सालाबाद प्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्यावतीने यंदा देखील ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण विभाग अशा दोन गटात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी श्री गणेश मूर्ती व मंडप परिसर स्वच्छता या दोन्हींचे निरीक्षण केले जाणार आहे. बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण मधील पहिल्या पाच क्रमांकाच्या सार्वजनिक श्रीमूर्तींना बक्षीसे दिली जातील. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण श्री गणेश प्रतिष्ठापणेपासून सुरू ‘केले. असून ते येत्या मंगळवार दि. 26 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्याच दिवशी म्हणजे येत्या मंगळवारी बक्षीस वितरण होणार आहे. तसेच ज्या मंडळांच्या मूर्तीचा प्रथम क्रमांक येईल त्यांना त्यांच्या मंडपाच्या ठिकाणी जाऊन बक्षीस वितरण केले जाणार आहे. श्रीमूर्ती विजेत्या मंडळांना फोनद्वारे कळविण्यात येईल. तरी सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी याची नोंद घ्यावी, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू शंकर केरवाडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta