
बेळगाव : लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा व स्वीच बोर्ड खुले असल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले व काही तासातच सदर विद्युत तारा आणि उघड्यावर असलेले स्वीच बोर्ड तात्काळ दुरुस्त करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले.
सदर बातमी प्रसारित होताच बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील तसेच महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी तात्काळ लेले ग्राऊंडवर पथक पाठवून सदर स्वीच बोर्ड व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. प्रशासन प्रशासनाच्या या कार्यतत्परतेमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta