बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखाना काकती या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. काकती येथील कारखाना कार्यस्थळावर सकाळी ठीक ११.०० वाजता या सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे.
तरी या सर्वसाधारण सभेसाठी कारखान्याच्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी, हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी पाटील व उपाध्यक्ष आर. आय. पाटील व संचालक मंडळाने केले आहे.