बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. दक्षिण व उत्तर अशा दोन विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
दक्षिण विभाग श्री गणेश मूर्ती
प्रथम : सार्व. गणेश उत्सव मंडळ बसवाण गल्ली, शहापूर.
द्वितीय : सार्व. श्री गणेश उत्सव मंडळ, मंगाई मंदिर वडगांव
तृतिय : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ टिळकवाडी
दक्षिण विभाग देखावा
प्रथम : सार्व. गणेशोत्सव मंडळ, समर्थ नगर ५ वा क्रॉस,
द्वितीय : न्यु गुडशेड रोड, एस पी एम रोड,
तृतिय : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ,राणा प्रताप युवक मंडळ हिंदुनगर टिळकवाडी
उत्तर विभाग श्री गणेश मूर्ती
प्रथम : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ कुलकर्णी गल्ली, बेळगाव,
द्वितीय : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, भारतरत्न पं. मदनमोहन मालवीय चौक, शनिवार खुट,
तृतिय : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ पाटीळ मळा बेळगांव.
उत्तर विभाग देखावा
प्रथम : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, सुभाष गल्ली, गांधीनगर दुसरा क्रॉस.
द्वितीय : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ माळी गल्ली, बेळगांव,
तृतिय : सार्व. श्री गणेशोत्सव मंडळ, बसव कॉलनी, बॉक्साईट रोड.
परीक्षक म्हणून सागर देसाई व सुमित खन्नूकर, जी डी आर्ट्स यांनी काम पाहिले. त्यांना जायंट्स पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या सर्व विजेत्यांना एका वेगळ्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta